Pune : ‘दिशा शोधणारी माणसं’, विशेष कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – नवी दिशा शोधून निरनिराळ्या क्षेत्रांत मार्गक्रमण करत (Pune)उज्ज्वल भारताच्या विकासात बहुमूल्य योगदान देणाऱ्या 5नामवंतांची बातचीत हा कार्यक्रम बुधवार दि. 31 जानेवारी 2024 सायं 5.00 वाजता टिळक स्मारक मंदिर, येथे आयोजित करण्यात आला आहे. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर हे 5 नामवंतांशी बातचीत करतील.

यामध्ये सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या सुनंदा पवार, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत गिते, कॉमसेन्स या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी स्टार्टअप कंपनीचे संस्थापक सागर बाबर आणि जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने प्रभावशाली युवा उद्योजिका म्हणून गौरविलेल्या लंडन येथील आर्या तावरे या पाच मराठी यशस्वी शिलेदारांशी डॉ. वासलेकर या प्रसंगी संवाद साधणार आहेत.

Pimpri : वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनकडून निषेध

या प्रसंगी ग्रामीण भागातील गरजू व होतकरू (Pune)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ६७ वर्षे कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समितीचा मानपत्र देऊन कृतज्ञता गौरव या समारंभात करण्यात येणार आहे.

डॉ. संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे प्रकाशनही अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आशिष अचलेरकर यांच्या हस्ते संपन्न होईल.

याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.