Akurdi News: क्रीडांगण विकसित करा; आपची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, दत्तवाडी,विठ्ठलवाडी, गंगानगर,विवेकनगर परिसरातील विद्यार्थी, युवक तसेच होतकरू खेळाडूंसाठी स्वतंत्र खेळाच्या मोठ्या मैदानाची नितांत गरज आहे. त्यामुळे महापालिकेने आकुर्डीत क्रीडांगण विकसित करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली.

आजची तरुण पिढी टीव्ही, मोबाइल आणि कॉम्पुटरमध्येच अडकून पडली आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदाने नसल्यामुळे कुठे खेळायचे,असा प्रश्न त्यांना पडतो. कबड्डी,क्रिकेट,खोखो,ज्यूडो,कराट, फुटबॉल,बॅडमिंटन ई सारखे मैदानी खेळ आणि इतर इनडोअर खेळांची या परिसरातील मुलांना आवड आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या क्रीडा धोरणात ‘सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला.

मुलांनी भाकऱ्या थापून तर मुलींनी इलेक्ट्रीक वायर जोडून साधला स्त्री-पुरुष समानतेचा समन्वय

आबालवृद्ध नागरिकांमध्ये शारीरिक सुदृढता आणि याद्वारे आरोग्यसंपन्न कार्यक्षम जीवनाचे महत्व त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना या क्रीडा धोरणात सुचविण्यात आली होती. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे,बंदिस्त कोर्ट आणि मूलभूत सुविधांसह खेळांची मैदाने विकसित करावीत.

‘अ’ क्षेत्रीय प्रभागासाठी मागील वीस वर्षांत महापालिकेने कोणतेही क्रीडाधोरण राबवलेले नाही. आकुर्डी, दत्तवाडी,विठ्ठलवाडी, गंगानगर,विवेकनगर सह लगतच्या परिसरातील हजारो विद्यार्थी, युवक युवतीमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी महापालिकेने नवीन मैदाने विकसित करावीत.त्यासाठी मोकळे भूखंड आरक्षित करून विशेष अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी बेंद्रे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.