Dhananjay Munde Accident : धनंजय मुंडे यांचा अपघात; चालकाचे सुटले नियंत्रण

एमपीसी न्यूज – धनंजय मुंडे यांचा परळीला जाताना मंगळवारी रात्री अपघात (Dhananjay Munde Accident) झाला अशी माहिती धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून ते परळीकडे परतत असताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात त्यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि छोटासा अपघात झाला. त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील त्यांनी सांगितले आहे.

या अपघातात त्यांची गाडी चक्काचूर झाली आहे. पुढील उपचारासाठी धनंजय मुंडे मुंबईला रवाना होणार आहेत.

Khadki : चोरीचा आरोप केल्याने दोघांना मारहाण

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.