Dighi : तीन अल्पवयीन मुलांकडून पाच दुचाकी जप्त; दिघी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – तीन अल्पवयीन मुलांकडून पाच दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील सहा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.ही कारवाई दिघी पोलिसांनी केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपूर्वी देहूफाटा आळंदी येथे मोबाईल दुकानदाराला मारहाण करून चोरी करणारा आणि स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करणा-या आरोपींचा दिघी पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दिघी परिसरात त्याच्या दोन मित्रांसह वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन तिघांकडून सुमारे 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. या करवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील सहा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.