Pimpri: आचारसंहितेची धास्ती; स्थायी समितीसमोर सुमारे 150 कोटींचे विषय!

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेसमोर कोट्यवधी रुपयांचे विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचे 108 विषय उद्या (बुधवारी) होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले आहेत.

  • ‘ही’ आहेत कामे!
    #आकुर्डीतील खंडोबा माळ ते म्हाळसाकांत चौक पालखी मार्गाचे डांबरीकरण
    #नाशिक फाटा ते वाकड आणि सांगवी ते किवळे बीआरटी मार्गांसाठी ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम बसविणे
    #आकुर्डीतील नाट्यगृहाचे उर्वरित कामे करण्यासाठी 24 कोटी,
    #आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्राचे संकल्पचित्र व अन्य कामे करणे, देखभाल दुरुस्ती आदी कामांसाठी 80 कोटी
    #चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह व मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी नऊ कोटी
    #निगडी जलशुद्धीकरण केंद्र व रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रावर कर्मचारी करणे
    #पिंपरीतील मोरवाडी, प्राधिकरण, कापसेचाळ, गणेशनगर आदी भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.
    #चिंचवडमधील वाकड, पिंपळे निलख, रहाटणी, तापकीरनगर, श्रीनगर, चिंचवडेनगर, लक्ष्मणनगर, गणेशनगर
    #चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, त्रिवेणीनगर, बोऱ्हाडेवाडी येथील नियोजित रस्ते व आरक्षणांचा विकास केला जाणार आहे. चऱ्होली-डुडुळगावमध्ये विद्युतकामे, चऱ्होली रस्ता विकसित करणे, भोसरी गावठाण, चिखली, मोशी, प्राधिकरणातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.