BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : इंद्रायणी नदीपात्रात शौचास गेलेल्या पेंटरला लुटले

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीपात्रात शौचासाठी गेलेल्या पेंटरला तिघांनी मिळून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास आळंदी देवाची येथे घडली.

हरिदास सुभाष सूर्यवंशी (वय 37, रा. पडाळवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिदास पेंटरचे काम करतात. ते मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास देवाची आळंदी येथील मातंग समाज धर्मशाळेसमोर इंद्रायणी नदीपात्रात शौचासाठी गेले होते. त्यावेळी तिथे तीनजण आले. त्यातील एकाने हरिदास यांच्या गळ्याला कोयता लावला आणि ‘तुझ्याजवळ काय आहे ते दे’ असा दम दिला. अन्य दोघांनी हरिदास यांच्याकडून मोबाईल फोन आणि दहा हजार रुपये असा एकूण 14 हजार 600 रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर तिघांनी मिळून हरिदास यांच्याशी झटापट करून त्यांना खाली पाडले व डाव्या पायाच्या टाचेवर वार केले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.