Dighi : जावयानेच मारला पावणेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; सासूची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज – पत्नी रुग्णालयात दाखल असताना सासू पत्नीला पाहायला आली. त्यावेळेची सासूकडून घराची चावी घेतली. त्या चावीच्या आधारे फ्लॅटमधून सोन्याचे दागिने व बँकेचा धनादेश (चेक) असा एकूण 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून जावयाने धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि. 16) पहाटे साडेबाराच्या सुमारास परांडे होम्स दिघी गावठाण येथे घडली.

छाया संजय छोगा (वय 47, रा. परांडे होम्स, दिघी गावठाण) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश समाधान चौधरी (वय 27, रा. साई पार्क दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा फिर्यादी छाया यांचा जावई आहे. शनिवारी योगेशच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे छाया आपल्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या. तिघे आरोपी योगेश होता. त्याने काही कामासाठी म्हणून छाया यांच्याकडून त्यांच्या फ्लॅटची चावी घेतली आणि दिघी गावठाण येथील छाया यांच्या घरी आला.

छाया यांच्या फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा 60 हजार रुपयांचा धनादेश असा एकूण 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.