Dighi : दुकानातून नेलेल्या वस्तूचे पैसे मागितल्याने दुकान पेटवले

एमपीसी न्यूज – दुकानातून शेगडी आणि मिक्सर नेल्याचे (Dighi)पैसे मागितल्याने तिघांनी मिळून दुकानासमोरील दुचाकी, सोफा यावर पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री दिघी येथील बालाजी होम अप्लायन्सेस येथे घडली.
प्रकाश मगाराम कुमावत (वय 29, रा. परांडेनगर, दिघी. मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित ज्ञानोबा सूर्यवंशी (वय 28, रा. दत्तनगर, दिघी) आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Dighi)प्रकाश कुमावत यांचे परांडे नगर येथे बालाजी होम अप्लायन्सेस नावाचे दुकान आहे. आरोपी अजित याने कुमावत यांच्या दुकानातून शेगडी आणि मिक्सर नेले. त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून अजित आणि त्याच्या साथीदारांनी कुमावत यांच्या दुकानातील दुचाकी आणि सोफ्यावर पेट्रोल टाकून दुकान जाळून टाकण्याच्या इराद्याने आग लावली. यामध्ये कुमावत यांचे 20 हजारांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.