Disha dance event: भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम  

एमपीसी न्यूज: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ दिशा ‘ या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन (Disha dance event) शनिवार, 20 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  करण्यात आले आहे.

Mini Marathon: अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीमध्ये उज्वल कुमार, आयुष वर्पे, रिचा बिश्त, शादृल जावळकर विजेते !!

‘मेघना साबडे यांच्या ‘नृत्ययात्री’ संस्था प्रस्तुत या कार्यक्रमात रमा क्षीरसागर (चेन्नई) डॉ अरुंधती श्रीनिवासन(चेन्नई) तेजस्विनी हलथोरे (बंगलोर) यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  136 वा कार्यक्रम  आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.(Disha dance event) युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दिशा’ कार्यक्रमामार्फत नृत्ययात्री संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याची माहिती संस्थापक  मेघना साबडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.