Vadgaon Maval : टाकवे बुद्रुक गावात सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकिकरण

एमपीसी न्यूज : टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीकडून कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून रविवार (दि 11) रोजी गावात सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकिकरण करण्यात आले.

 याप्रसंगी  सरपंच भूषण असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, सदस्य सोमनाथ असवले, परशुराम मालपोटे, सुवर्णा असवले, दत्तात्रय असवले, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक दिलीप आंबेकर व शेखर मालपोटे आदी उपस्थित होते.

सॅनिटायझर फवारणी व निर्जंतुकिकरण करण्याबाबत आरोग्य विभागाने यापूर्वी ग्रामपंचायतीला सुचना दिल्या होत्या. अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी निर्णय घेऊन रविवारी संपूर्ण टाकवे गावात औषध फवारणी करून निर्जंतुकिकरण केले.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून नागरिकांनी नियमांचे नियमित पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.