Pimpri : युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वक्त् व व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी वक्तृत्व स्पर्धेचे विषय – १) गांधीवाद आणि आजचा तरुण, २)मोहनदास ते महात्मा (एक असाधारण आणि अपंरपरागत प्रवास), ३) गांधीजींचे विचार जीवनात उतरविण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न. निंबध स्पर्धेचे विषय – १) गांधीजी मला भेटले, २) गांधीजी जे मला समजले, ३) गांधीवाद वैश्विक शांतते सर्वोत्तम पर्याय, ४) असहकार आणि छोडो भारत या संकल्पनांची आज आवश्यकता आहे का ?

या स्पर्धा माध्यमिक, कनिष्ठ महविद्यालयीन व पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांसाठी आहे. निबंध जमा करण्याची अंतिम तारीख दि १०/१०/२०१८ असेल व सदर निबंध आप-आपल्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यालयामध्येच जमा करावे. वक्तृत्व व स्पर्धासाठी व नावनोंदणी साठी संपर्क क्र ९८६०१७७१७७ आहे.

दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजर्नार्थ परितोषिके व स्मृति चिन्हे देण्यात येतील. तरी सर्व शाळा महाविद्यालये संस्था व संघटना यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.