Lonavala : व्हीपीएस ला उपक्रमशील शाळा पुरस्कार

एमपीसी न्यूज – येथील व्ही.पी.एस.हायस्कूल व डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालय यांनी शहरामध्ये सातत्याने राबविलेल्या  विविध शासकीय अशासकीय विद्यार्थी विकासाच्या उपक्रमांची नोंद घेऊन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे यांच्या वतीने जिल्हा स्तरीय कृतीशील शाळा पुरस्कार तसेच उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार आण्णा भाऊ साठे सभागृह स्वारगेट पुणे येथे झालेल्या भव्य शिक्षक गौरव समारंभात प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार विद्यालयाचे प्राचार्य सुधींद्र देशपांडे यांनी शाळेच्या अन्य शिक्षकांसमवेत शिक्षण अधिकारी गणपतराव मोरे व शिक्षण उपसचिव अशोकराव भोसले यांचे शुभहस्ते स्वीकारला.

या अजोड पुरस्काराने शिक्षक व विद्यार्थी समुहात आनंदाचे वातावरण असून शाला समिती अध्यक्ष बच्चुभाई पत्रावाला व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य मारुती तारु, मुख्य लिपिक भगवान आंबेकर व अध्यापक वसंत बुरांडे, विठ्ठल खेडकर, महेश चोणगे, हरिभाऊ कुलकर्णी व दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.