Diwali celebration by innerwheel : आनंद वाटल्याने तो द्विगुणित होतो – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगावच्या वतीने निगडे येथील ठाकरवस्ती मध्ये जाऊन दिवाळीचा फराळ वाटप करत श्रीगणेशा केला. इनरव्हीलच्या माध्यमातून ब्लँकेट, साड्या, कंपास, पेन्सिल, फराळ, चॉकलेट यांचे वाटप करण्यात आले. आनंद वाटल्याने तो द्विगुणित होतो. त्यामुळे आनंद समाजातील प्रत्येक घटकांसोबत साजरा करायला हवा, असे मत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी  व्यक्त केले.
आनंद वाटला की द्विगुणित होतो, आयुष्यात एखाद्या गोष्टीचे अप्रूप असणे फार महत्वाचे असते. एखादी मनाच्या कोपऱ्यात दडलेली इच्छा अगर उत्सुकता जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा चेहऱ्यावर उमटणारी हास्याची लकेर समाधान देऊन जाते. जिथे मूलभूत गरजांची वानवा असते तिथे ब्रँड नावाचा पर्याय नसतो, मग अशाच ठिकाणी जाऊन आनंद साजरा केला तर काय हरकत आहे. अशाच भावनेतून तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लब ने निगडे येथील ठाकरवस्ती मध्ये जाऊन दिवाळीचा श्री गणेशा केला. सर्व इनरव्हील मैत्रिणी, पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून दिवाळीची छान सुरुवात झाली.

diwali celebration by innerwheel club
अध्यक्षा वैशाली दाभाडे,प्रकल्प प्रमुख अर्चना देशमुख,निशा पवार,डॉ लता पुणे,सानिका पाटील,मीरा बेडेकर आदी सदस्य उपस्थित होते.
अनुप्रिया खाडे, डाॅ लीना कवितके, अर्चना देशमुख,अर्चना पिंपळखरे, हेमलता खळदे,अलभा पारेख,नीता काळोखे,सुनीता काळोखे,साधना भेगडे,ममता मराठे, भाग्यश्री काळेबाग,मुग्धा जोर्वेकर, नीलिमा बारटक्के, उज्वला बागवे, दीपाली भंडारी, डॉ लता पुणे,मंगल पवार, वैशाली झामखेडकर,सुनीता अगरवाल,डॉ क्रांती इंगळे,भाग्यश्री फरतोडे,नीता देशपांडे,वैशाली चव्हाण,ज्योती पाटील,सीमा खळदे, साधना काळोखे,सुलभा मथुरे, सानिका पाटील,संगीता शेडे,रश्मी थोरात,आरती भोसले,वैभवी पवार, कल्याणी मुंगी,सुचित्रा कडवे,पल्लवी शेवडे,आदी सदस्यांनी प्रकल्पास विविध स्वरूपात साह्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.