Maval : अंध विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबकडून ऑडिओ पुस्तकांची मदत

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील (Maval) इयत्ता दुसरी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने ऑडिओ बुक देण्यात आली. मावळ तालुक्यात एकूण 446 शाळा असून त्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी अंशतः अंध 144 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठीही पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. ही पुस्तके ऐकून त्याद्वारे अंध विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहेत. प्रोजेक्ट चेअरमन मुक्ता जोर्वेकर यांनी यशोवाणी संस्थेच्या संचालकामार्फत ही पुस्तके मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले.

Laxman Jagtap : ‘क्रिस्टल’कडून सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक, ठेकेदारावर तातडीने कारवाई करा – लक्ष्मण जगताप

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सोमवार (दि 22) वडगाव मावळ पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग येथे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आणि शिक्षण विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या (Maval) शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा लाभदायक प्रकल्पांची चर्चा झाली.

इनरव्हील क्लब अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी काही प्रकल्पांची घोषणा केली. तसेच, अंशतः दृष्टीहीन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्लबने इयत्ता 2 री ते 9वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची श्राव्य पुस्तकं (Audible Books) डिजिटल पद्धतीने प्रदान करण्यात आली. यानुसार विद्यार्थी रेकाॅर्डींग ऐकून परीक्षा देऊ शकतात. याप्रसंगी इनरव्हीलच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, सेक्रेटरी निशा पवार, मुग्धा जोर्वेकर, ज्योती जाधव उपस्थित होत्या.

प्रोजेक्ट चेअरमन मुग्धा जोर्वेकर यांनी ही श्राव्य पुस्तके पुणे येथील यशोवाणी संस्थेच्या डायरेक्टर प्राची गुर्जर यांच्यातर्फे उपलब्ध करून दिली. याप्रसंगी समग्र शिक्षा अभियान विषय साधना व्यक्ती शीतल शिशुपाल, विशेष शिक्षिका स्मिता राजे, सुमित्रा कचरे, शकीला शेख, साधना काळे, लता वनवे यांचे विशेष सहकार्य लाभले. मावळ तालुक्यात एकूण 446 शाळा आहेत. एकूण दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी अंशतः अंध 144 विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी प्रकल्पाचे लाभार्थी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.