Chandrakant Patil : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणार

एमपीसी न्यूज – जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॅंटोन्मेंट बोर्डाच्या विविध विकासकामांविषयी त्यांना माहिती देण्यात आली.(Chandrakant Patil) यावर चंद्रकांत पाटील यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व कामांसाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे शेलार परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे त्यांच्या समवेत होते. पुणे जिल्हा किसान संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव शेलार, देहूरोड शहर भाजपचे माझी अध्यक्ष उद्धव शेलार, देहूरोड शहर भाजपचे अध्यक्ष  बाळासाहेब शेलार, गजानन शेलार, विश्वनाथ  शेलार,अनंत चंद्रचूड, विलास शिंदे, धर्मेंद्र प्रसाद, प्रफुल शेलार मयुर शेलार, आदिनाथ शेलार, महेश शेलार इत्यादी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.

Diwali celebration by innerwheel : आनंद वाटल्याने तो द्विगुणित होतो – वैशाली दाभाडे

यावेळी त्यांना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील विविध विकासकामे  व राज्य सरकार कडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डला GST शेअर मिळणे, शेलारवाडीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मिळणे, माजी मंत्री संजय बाळा भेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Chandrakant Patil) काळात सिद्धिविनायक नगरी, दत्तनगर, श्री विहार या भागासाठी साठी जी 5 कोटी 49 लक्ष रुपयांची पाणी योजना मंजूर केली होती त्या योजनेचे नव्याने टेंडर करणे, व राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजना इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू कराव्या ज्याचा देहूरोड मधील सामान्य नागरिक, महिला, विदयार्थी, यांना फायदा होईल. या सर्व विषया संदर्भात निवेदन दिले.

यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  या सर्व कामा संदर्भात लवकरात लवकर शासन योग्य ती कार्यवाही करील असे आश्वासन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.