Crime News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत डॉक्टरची 35 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिन्याला दोन टक्के परतावा देऊ म्हणत रहाटणी येथील एका डॉक्टरांची 35 लाख (Crime News)  रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 22 मार्च 2019 ते आज अखेर अशी दोन वर्षाच्या कालावधीत घडली.

 

Vadgaon News : दशक्रिया विधी दरम्यान आरोग्यविषयक कार्यक्रमातून प्रबोधन;म्हाळसकर परिवाराचा लोकोपयोगी उपक्रम

 

 

याप्रकरणी डॉ. अशोक कृष्णा भोंडवे (वय 62 वर्ष रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार (Crime News)  दाखल केली आहे. त्यानुसार अनिल सोमेश्वर नायर (वय 53) व प्रिता अनिल नायर (वय 42) दोघेही राहणार विजयनगर, काळेवाडी या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News : इन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भोंडवे यांच्या घरी जाऊन नायर दाम्पत्यांनी आम्ही चिटफंडचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. यामध्ये पैसा गुंतवला असता डॉक्टरांना महिन्याला दोन टक्के परतावा देण्याचे आमिष (Crime News)  दाखविले. त्यानुसार डॉक्टरांनी नायर यांच्याकडे 35 लाख रुपये गुंतवले मात्र डॉ. भोंडवे यांना आज अखेर केवळ 15 हजार रुपये नायर यांनी परतावा म्हणून दिले.वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.