Republic Day : 26 जानेवारीला प्लास्टिकचा ‘तिरंगा’ वापरू नका : केंद्रीय गृह मंत्रालय

एमपीसी न्यूज : केंद्रीय गृह मंत्रालयाने 26 जानेवारीसाठी नियमावली जाहीर केली आहे. यात प्रजासत्ताक दिनाला प्लास्टिकचा तिरंगा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी लोकांनी कापडाच्या किंवा कागदाने तयार केलेल्या ध्वजाचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे.

प्लास्टिकचे ध्वज हे बराच काळ टिकून राहतात आणि त्यांना डिस्पोज करणेही अवघड असते. त्यामुळे तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेत भारतीय नागरिकांनी प्लास्टिकचा ध्वज वापरणे टाळावे असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. तसेच त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना घालून दिलेल्या नियमांचे कडेकोट पालन होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपली आन-बान-शान आणि आपल्या देशाची ओळख आहे. त्यामुळे त्याचा अवमान होणार नाही, याची काळजी घेणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मात्र, काही राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांत कागदाने तयार करण्यात आलेल्या ध्वजाऐवजी प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करण्यात येतो. प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अवघड असते, असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.