Mumbai News : ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ ग्रंथाचे डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) होणार आहे.

मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी (दि.10) दुपारी 3.30 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे. सोहळ्याचे आयोजन ‘एमजीडी मिशन इंडिया’च्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती एमजीडी मिशनचे संचालक तथा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, एमजीडी मिशनचे संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.