Talegaon : तळेगाव वराळेच्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फेडरेशनची पूरग्रस्तांना मदत 

एमपीसी न्यूज  –  सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तळेगाव वराळे यांच्याकडून वस्तू  व देणगी रूपात मदत करण्यात आली.

डॉ .डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील, संस्थेचे चारही विभाग डॉ. डी. वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, डॉ. डी. वाय पाटील मॅनेजमेंट कॉलेज, डॉ.डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेज सायन्स, डॉ.डी. वाय पाटील एक्सलन्स स्कूल सीबीएसई यांच्याकडून सांगली  व कोल्हापूर  येथील पूरग्रस्तांसाठी वस्तू  व देणगी रूपात मदत करण्यात आली.

यावेळी सचिव अॅड. अनुजा सुशांत पाटील, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. सुनील इंगोले, प्रिन्सिपल स्कूलचे डॉ. सोनल पाटील, एम. बी.ए.चे डायरेक्टर डॉ. राजवर्धन एंडी आदी उपस्थित होते. संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी त्यामध्ये उस्फूर्तपणे  सढळ हाताने  पूरग्रस्तांसाठी देणगी दिली .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.