Mumbai News : देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ : नवाब मलिक

एमपीसी न्यूज : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजपचे विरोधाीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

 

एनसीबी अधिकारी आणि भाजपचा काय संबंध आहे. याबाबतचा खुलासा नवाब मलिक करणार आहेत. मलिक मागील काही दिवसांपासून रोज नवे नवे खुलासे करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत आहेत. तर आज भाजप आणि ड्रग्ज पेडलरचा संबंध काय याबाबत चर्चा करुया असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

एका अज्ञात व्यक्तीचा फोटो ट्विट करत मंत्री नवाब मलिक यांनी हा व्यक्ती कोण आहे? असा सवाल केला आहे. दरम्यान राजकीय विश्लेषक निषांत वर्मा यांनीसुद्धा या व्यकीचा फोटो ट्विट केला असून यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसत आहेत. फोटोतील व्यक्ती हा ड्रग्ज पेडलर असून अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान नवाब मलिकांनी ट्विट केलेला फोटो हा ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याचा आहे. राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनीसुद्धा हा फोटो ट्विट केला असून त्यांनी असे म्हटलं आहे की, फोटोतील व्यक्ती जयदीप चंदूलाल राणा असून त्याला एनसीबीने जून २०२१ रोजी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. राणा सध्या तुरुंगात आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे त्याचे आणि भाजपचा संबंध काय? असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.