Talegaon Dabhade News : कोरोना संकटामुळे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव कार्यकारणी दोन वर्षांपूर्वीचीच कायम

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीचे सावट आल्यामुळे तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी केलेली कार्यकारणी पुन्हा ठेवण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. हा उत्सव दरवर्षी गुढी पाडव्याला साजरा केला जातो.

अध्यक्ष –  गोकुळ अनिल भेगडे

खजिनदार-प्रणव मारुती भेगडे

सरचिटणीस- निरंजन संभाजी भेगडे

प्रसिद्धी प्रमुख -आश्विन नथु माने

उपाध्यक्ष-  प्रणव दाभाडे, सिध्दार्थ किल्लावाला,अक्षय पाटोळे,चरण भेगडे,स्मितेश भेगडे,शुभम काकडे,गणेश शेलार

सहखजिनदार- अजय पवार,दर्शन टकले,ओमकार भेगडे,कुणाल दाभाडे,समीर दाभाडे,शारुख शेख,ओंकार दाभाडे,स्वप्निल शाम दाभाडे,कुणाल लोंढे.

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी होत असतो. पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारा हा उत्सव गुढीपाडव्याला असतो.दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीचे सावट आल्यामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी केलेली कार्यकारणी पुन्हा ठेवण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला. या प्रसंगी तळेगाव दाभाडे येथील सर्व वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अध्यक्ष गोकुळ अनिल भेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या वर्षीचा डोळसनाथ महाराजांचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल असे आवाहन केले. तसेच खजिनदार प्रणव मारुती भेगडे यांनी मागील वर्षीचा अहवाल जाहीर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.