Eknath Shinde Update : काळजी करू नका, सरकार पडणार नाही – रोहित पवार

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) हे आपल्या काही आमदारांसह नॉटरिचेबल आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. काळजी करू नका, महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार म्हणाले, कोणीही काळजी करू नका. महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. कारण देशाचे जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी ही महाविकास आघाडी केली आहे. सर्वांना एकत्रित जोडण्याच्या हेतूने ही आघाडी स्थापन केली आहे. पण काही लोकांना जोडणे पसंत नसते. म्हणून ते तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जेष्ठ नेते शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मित्र पक्षांचे नेते (Eknath Shinde Update) प्रामाणिकपणे सरकार टिकवणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.