Legislative Council election : हा विजय म्हणजे देवेंद्रजींची कमाल, विधानपरिषद निवडणूक भाजपचा विजयी जल्लोष

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यशस्वी नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची समर्थ साथ, भाजपवरील जनतेचा विश्वास, भाजपचे विकासाचे धोरण, सुशासन आदीचा हा विजय असून, आघाडी सरकारच्या अंधकारमय कारभाराला सुरूंग लावून विकासाची मशाल पेटविणारा हा विजय असून, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत पाचही जागांवर (Legislative Council election) मिळविलेला विजय हा देवेंद्रजींची कमाल असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेतील यशानंतर शहर भाजपच्या वतीने आज महापालिकेसमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुळीक बोलत होते.
मुळीक म्हणाले, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council election) विजयाची किमया करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला असून, स्वबळावर म्हणजे काय याचा राजकारणात अर्थ शिकविला. अन्य पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, ज्यांना स्वत:चे आमदार सांभाळता येत नाही, त्यांनी आता न बोललेच बरे राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.