Kondhwa Rape Case : 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरातून (Kondhwa Rape Case) एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला मारहाण करत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 जून ते 19 जून या कालावधीत हा प्रकार घडला. शकील बागवान या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 22 वर्षीय पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार आलेली आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती. परंतु फिर्यादीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतरही आरोपीने वारंवार तिचा पाठलाग केला. फिर्यादीने या प्रकरणी तक्रारही दिली होती. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

त्याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला (Kondhwa Rape Case) ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला डांबून ठेवत कंबर बेल्टने मारहाण केली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.