Election Result 2022 Analysis: गोव्यात पुन्हा ‘भाजप’लाच पसंती; इतर पक्षांचे काय चुकले?

एमपीसी न्यूज (राजन वडके) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत भाजपने पुन्हा विजयाचा झेंडा रोवला आहे. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाने अनपेक्षित यश मिळवत राजकीय नेते आणि विश्लेषकांना धक्का दिला आहे.

या पाचही राज्यांतील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला जवळपास बेदखल केल्याचे चित्र आहे. केवळ गोव्यामध्येच पक्षाची लाज राखली गेली असेच म्हणायला हवे. दरम्यान, या चार राज्यांमधील निवडणुकीच्या निकालांवरून मोदींचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचे जाणवते आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची ही नांदी ठरली असून, केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी भाजपचा रस्ता सोपा झाल्याचे मत राजकीय नेते व विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. तर, पंजाबची एकहाती सत्ता हस्तगत करणारा आप अन्य राज्यांत हळूहळू पाय पसरू लागला आहे.

गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता; विजयी घौडदौडीचे थोडक्यात विश्लेषण –

गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने पुन्हा बाजी मारली आहे. देशभरात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत फक्त गोव्यामध्ये काँग्रेसला स्वतःचे अस्तित्व दाखविता आले आहे.

या निवडणुकीच्या निकालाने भाजपने सर्व एक्झिट पोल जवळपास खोटे ठरविले आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू सरकार येण्याचा अंदाज बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. परंतु, गुरुवारी मतमोजणी सुरू झाल्यावर जसजसे निकाल हाती येऊ लागले तेव्हा सत्तेची खुर्ची पुन्हा भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली होती. भाजप मधील पक्षांतर्गत वाद, गटबाजी, बंडखोरी ही आव्हाने होती. गोव्यातील खाणींचा मुद्दा कळीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या भोवती राजकारण फिरत आहे. या निवडणुकीतही सर्व राजकीय पक्षांनी तो मुद्दा उचलला होता. त्याचबरोबर नोकर भरती घोटाळा अशी आव्हाने होती. या सर्व गोष्टींनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्रस्त झाले होते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानंतर फडणवीस यांनी गोव्यात तळ ठोकून उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंत सर्व गोष्टी अतिशय चातुर्याने हाताळल्या.

त्याचबरोबर भाजपला शह देण्यासाठी शिवसेने आणि राष्ट्रवादीने त्यांचे उमेदवार उभे केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, आदित्य ठाकरे या तिघांनी तेथे प्रचारसभा घेतल्या. हे आव्हानही फडणवीस यांनी परतवून लावले. त्याचा फायदा निकालावर झाला. निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाहीच आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीत जी एक जागा मिळवली होती ती ही गमावली.

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद, गटबाजी, नाराजी होतीच. काँग्रेसच्या हातून गोव्याची सत्ता गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालूनही पक्षांतर्गत वातावरण गढूळच राहिले होते. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह होते. मात्र स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे पक्षाला दोन आकडी संख्या गाठता आली. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि गोवा फॉर्वर्ड पार्टी यांची तकदही घटल्याने त्यांचे अस्तित्व फार जाणवले नाही. मात्र निवडणुकीत उतरलेल्या टीएमसीने तसेच आम आदमी पक्षाने आपले अस्तिव दाखवले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मिळवलेल्या यशाबरोबर त्यांच्या गोव्यातील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.