Pune : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्कासह भरावयाच्या तारखांमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमार्फत नियमित शुल्कासह १५ ऑक्टोबर
ते २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील तर विलंबित शुल्कासह २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येतील.

_MPC_DIR_MPU_II

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  परीक्षेच्या म्हणजेच बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली
होती. या मुदतीत ‘सरल डेटाबेस’मधून अर्ज करताना काही ज्युनिअर कॉलेजेसला अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे, तर ज्युनिअर कॉलेजला चलन व शुल्क भरण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे. चलन व शुल्क भरल्यानंतर ज्युनिअर कॉलेजना १९ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांची यादी जमा करायची आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

सदर आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून ऑनलाईन www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.