Hinjawadi : कॅबची वाट पाहणाऱ्या तरुणाची बॅग पळवली

एमपीसी न्यूज – कॅबची वाट पाहत असलेल्या तरुणाची बॅग पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास चांदणी चौक येथे घडली.

आयुष सर्वेश शर्मा (वय 23, रा. शिंदेवाडी, पिरंगुट, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चांदणी चौक येथे कॅबची वाट पाहत उभे होते. दरम्यान ते लघुशंकेसाठी गेले असता रस्त्यावर ठेवलेली त्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. बॅगेमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 16 हजार 300 रुपयांचा ऐवज होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.