Nigdi News : प्राधिकरणाच्या शैक्षणिक भूखंड ई-निविदा प्रक्रियेला मुदतवाढ 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विविध पेठातील शैक्षणिक भूखंड वाटप ई-निविदा प्रक्रियेला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राधिकरणातील दहा भूखंडांचे 99 वर्षांसाठी वाटप केले जाणार आहे त्यासाठी इच्छुक शैक्षणिक संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.  

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. सुरवातीला ई-निविदा सादर करण्यासाठी 10 एप्रिल अंतिम मुदत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला लॉकडाऊन यामुळे भूखंडाची पाहणी करता येत नाही तसेच, वेळेत निविदा सादर करण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शैक्षणिक संस्था करत होत्या. अखेर ई-निविदा प्रक्रियेला 30 एप्रिल सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

* असा आहे भूखंडांचा तपशील 

एक ते पाच भूखंडाचे तांत्रिक लिफाफे 4 मे सकाळी अकरा वाजता व सहा ते दहा भूखंडाचे तांत्रिक लिफाफे 5 मे सकाळी अकरा वाजता उघडण्यात येणार आहेत. असे, प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.