Pune : ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2018’ जाहीर

शिवकुमार डिगे, अन्वर राजन, डॉ . सुमंत पांडे, संजय यादवराव ठरले मानकरी

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ जाहीर झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा अ . भा . मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे शिवकुमार डिगे (माजी धर्मादाय आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक -रजिस्ट्रार ,मुंबई ),अन्वर राजन (सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ,पुणे ), डॉ . सुमंत पांडे (संचालक ,जलसाक्षरता केंद्र ,यशदा ,पुणे ), संजय यादवराव (कोकण भूमी प्रतिष्ठान,मुंबई ), डॉ. जे . बी . गारडे (नामवंत दंत शल्य चिकित्सक,पुणे ) यांना ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ ने गौरविण्यात येणार आहे .

किशोर धारिया (पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटन ),राजेंद्र आवटे (ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माण ),संजय भंडारी (इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग ) यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मान’साठी करण्यात आली आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’साठी डॉ . शैला बूटवाला (प्राचार्य,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय )आणि जुलेखा शेख (ऑफिस सुप्रीटेंडेंट, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय ) यांची निवड करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसादिवशी हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी डॉ. पी.ए.इनामदार यांचा ७४ वा वाढदिवस असून, सन्मानाचे दशकपूर्ती वर्ष आहे. सन्मानचिन्ह ,शाल ,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.