Pune : आंबेगाव बुद्रूक येथे प्लास्टिकच्या पिशवीत सापडले जिवंत स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज – आंबेगाव बुद्रूक येथील पंढरपूर अर्बन बँकेलगत असलेल्या गल्लीत एका प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले. नेताजी कांतागळे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोणीतरी अज्ञात इसमाने किंवा महिलेने स्त्री अर्भकाच्या जन्माची लपवणूक करण्यासाठी व जन्मानंतर अर्भकाचा मृत्यू व्हावा या उद्देशाने कॅरीबॅग घालून मरण्यासाठी उघड्यावर टाकून दिले. हे अर्भक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच लक्षात आल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.