Pune : ग्राहकांनी दिलेले पैसे कंपनीत न भरता कर्मचा-याकडून 6 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – ग्राहकांनी दिलेली रकम कंपनीत न भरता कर्मचा-याने सहा लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वरुण श्रीनिवासन (वय 36, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हेमंत चंद्रकांत रेड्डी (वय 37, रा. भैरवनगर, पुणे) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत हा शिबा कुरीज लि. कंपनी बोपोडी, पुणे येथे डेली कलेक्शन एजंट या कामावर नेमणुकीसाठी होता. त्याने 2018 ते 24 एप्रिल 2019 या दरम्यान ग्राहकांनी त्याच्याजवळ दिलेली एकूण 5 लाख 99 हजार 682 रुपयांची रक्कम कंपनीत जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरून या रकमेचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली.

खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.