Hadapsar : अखेर हडपसरला कोव्हीड टेस्ट सेंटर सुरू 

Finally Hadapsar Covid Test Center started बुधवारी सकाळी ११ वाजता या स्वॅब सेंटरचे लोकार्पण आमदार चेतन तुपे पाटील याच्या हस्ते करण्यात आले.

एमपीसी न्यूज – हडपसरला कोविड टेस्ट सेंटर व्हावे म्हणून खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, माजी महापौर वैशाली बनकर यांनी खुप पाठपुरावा केला. 

परंतु, सर्व तयारी होऊन सुध्दा लॅब टेक्निशियन मिळत नव्हते. त्यामुळे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र  हंकारे यांना नगरसेवक योगेश ससाणे यांनी ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता काॅल करून मनपासमोर “खाली डोके, वर पाय “ आंदोलन “ करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा रात्रीत चक्र फिरून डॉ. हंकारे यांनी बुधवारी सकाळी ७ वाजता काॅल करून लॅब टेक्निशियन पाठवून देतो,  असा निरोप दिला. दिनांक ७ जुलै रोजीच स्वॅब घेणे चालु करण्यात आले होते.

बुधवारी सकाळी ११ वाजता या स्वॅब सेंटरचे लोकार्पण आमदार चेतन तुपे पाटील याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. हडपसर विधानसभा मतदार संघातील हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नागरिकांसाठी कै. रामचंद्र आप्पा बनकर एज्युकेशन व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मोफत कोरोना स्वॅब सेंटर व क्वारंटाईन सेंटरचे उद्घाटन केले. सध्या एक डॉक्टर व एक लॅब असिस्टंट या सेंटरवर कार्यरत आहेत. अजून डॉक्टर्स आणि लॅब असिस्टंटची मागणी आयुक्तांकडे केली असून येत्या दोन दिवसात त्याला मान्यता मिळेल.

यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. माजी महापौर वैशालीताई बनकर, नगरसेवक योगेश  ससाणे, नगरसेविका पुजा कोद्रे, सहाय्यक आयुक्त वैभव कडलग, स्विकृत सदस्या संजीवनी जाधव, स्विकृत सदस्य मनोज घुले, स्विकृत सदस्य अविनाश काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे, डॉ. मोहित नरवडे, माजी नगरसेवक सुनील बनकर, डॉ. शंतनू जगदाळे , विजय मोरे, सागर राजे भोसले, विक्रम जाधव, विठ्ठल विचारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.