Phugewadi : अखेर फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला स्वतंत्र मुख्याध्यापक मिळाले

पिंपरी युवासेनेच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयाला स्वतंत्र मुख्यध्यापक मिळावे, अशी मागणी पिंपरी युवासेनेनी शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांना केली होती. त्या मागणीनुसार सुजाता पानसरे यांची प्रभारी मुख्यधापक पदी निवड केली.

यावेळी पिंपरी युवासेनेतर्फे सुजाता पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील काही समस्या असेल तर युवासेनेतर्फे योग्य पाठपुरवठा  करून सोडवू, असे मत युवासेना जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे यांनी केले. यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, रुपेश कदम, विभागसंघटक निलेश हाके, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, सनी कड, व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.