Pune : चिनी मांजामध्ये अडकलेल्या पारव्याची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज – कोंढवा खुर्द शीतल पेट्रोल पंपासमोर कोणार्क पुरंम सोसायटीच्या आवारात सुमारे 50 ते 60 फूट उंचीवर चायनीज मांजामध्ये अडकून घायाळ झालेल्या पारव्याची शर्तीच्या प्रयत्नानंतर जिवंत सुटका करण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

चिनी मांजामुळे दुचाकीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्याला 5 ते 6 टाके पडल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली. या अपघातात महिला गंभीररीत्या जखमी झाली होती. वेळीच उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.

अशा प्रकारच्या गंभीर अपघातामुळे जीव देखील जाऊ शकतो. आज अशाच अपघाताला एका पारव्याला सामोरे जावे लागले आहे. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची वेळीच मदत करून त्याला जीवनदान दिले.

यापुढे अशाप्रकारच्या किती घटना पाहायला मिळणार आहेत हे सांगता येत नाही. तरी नागरिकांनी सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
ही कामगिरी कोंढवा अग्नीशमन दलाचे गणपत पदये, योगेश जगताप, तेजस खरीवले, अविनाश लांडे, रोहित रणपिसे, विशाल गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.