Pune : अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज –  अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.16) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार,  अरण्येश्वर कॉर्नर येथील एका स्पेअर पार्टच्या गोडाऊनला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या एकूण सात गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.