Hinjawadi : माती चोरून नेणा-या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेतून माती चोरून नेत असताना पाच जणांना पकडले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या सुमारास नेरेदत्तवाडी येथे घडली.

सुग्रीव किसन खैरे (रा. गुजरनगर, थेरगाव), प्रवीणकुमार दादा जगधने (रा. विनोदेवस्ती, वाकड), अशोक रामलाल शर्मा, मारुती बबन वाईकर (दोघे रा. इंदिरा कॉलेज जवळ, ताथवडे), शिवाजी रंगनाथ चखाले (रा. विशालनगर, पिंपळे निलख), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण शिवाजीराव गायकवाड (वय 32, रा. हडपसर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण यांची नेरेदत्तवाडी येथे जागा आहे. त्या जागेतून आरोपी पाच हजार रुपयांची चार ब्रास माती चोरून नेताना आढळले आहेत. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.