Rahatani News : राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधून पाच जणांची निवड

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधून पाच जणांची निवड करण्यात आली आहे. हेवन जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमी, रहाटणी येथे शनिवारी (दि.26) पार पडलेल्या निवड चाचणीत विविध वयोगटातील सात स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेसाठी 11 वर्षाखालील सृष्टी खोडके, 14 वर्षाखालील पारिजा क्षीरसागर, 17 वर्षाखालील वृंदा सुतार आणि खुल्या वयोगटातील एकेरी पुरुष प्रणित आढाव यांची निवड झाली. मुद्रा चिलात्रे आणि निधी आसबे यांनीही उत्साहाने सादरीकरण केले, अशी माहिती संचालक व विपणन प्रमुख चैतन्य कुलकर्णी यांनी दिली. 6 मार्चला जळगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार आहे.

सर्व खेळाडूंना सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदकं प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली. मुख्य प्रशिक्षक अलका तापकीर, अतुल पाटील, अपेक्षा पाटील, स्वप्ना कळमकर, लीना आढाव व इतर सर्व पालकांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.