Chinchwad : मोहननगर येथे आठवडाभरात साडेपाच हजार गरिबांना अन्नदान

नगरसेविका मीनल यादव यांनी संकटकाळात जपली सामाजिक बांधिलकी

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यांनतर गोरगरिबांचे अन्नधान्यावाचून हाल होऊ नये म्हणून मोहननगर येथील शिवसेना नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव यांनी अन्नदान सुरू केले. यामध्ये गेल्या आठवडाभरात सुमारे साडेपाच हजार नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.

नगरसेविका यादव यांच्या मोहननगर येथील कार्यालयात हे अन्नदान सुरु आहे. या ठिकाणी परिसरातील गोरगरीब नागरिक, मजूर, स्थलांतरित नागरिक आदींना अन्नदान केले जात आहे. नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव यांच्यासह शशिकांत पाडाळे, सुमित धुमाळ, गणेश महाजन, तेजस जगताप, कल्पेश घुले, गौरव राठोड, कुलदीप सावंत, आकाश राजिवडे, राजू जाधव, जालिंदर कर्डीले, टिपू सुलतान आदी कार्यकर्ते अन्नदानासाठी मेहनत घेत आहेत. यापुढेही अन्नदान सुरु राहणार असल्याचे नगरसेविका यादव यांनी सांगितले.

 

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार अडचणीच्या काळात आम्ही गोरगरीब नागरिकांना मदत करीत आहोत. या आधीही अनेक प्रकारची मदत केली आहे. मात्र, सध्याचा कोरोना महामारीचे संकट मोठे आहे. तरीही आम्ही आणि आमचे शिवसैनिक नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

विशाल यादव : शिवसेना विभागप्रमुख.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.