Wakad : नागरी सुविधांच्या मागणीसाठी अपना वतनचे ड प्रभाग कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – वाकडमधील अण्णाभाऊसाठे नगर, म्हतोबा नगर, काळाखडक या झोपडपट्यांमधील नागरी सुविधा पुरवाव्यात व नागरिकांच्या मागणीनुसार पुनर्वसन किंवा मालकी हक्काचे उतारे मिळावेत या मागणीसाठी सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली अपना वतन संघटनेच्या वतीने “ड” प्रभाग कार्यालयावर” बेधडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये झोपड्पट्टीधारकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा मोर्चा १६ न भाजीमंडई ते काळेवाडी फाटा मार्गे ड प्रभागवर पायी नेण्यात आला. प्रभाग कार्यालयावर गेट बंद करून मोर्चा अडविण्यात आला.  त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळेस नागरिकांना मार्गदर्शन करताना अपना वतनचे सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले की, या शहराचा विकास करण्यासाठी याच झोपडपट्ट्यातील नागरिकांनी कष्ट केले आहेत. मोठे रस्ते, टोलेजंग इमारती बांधणारे हात हे गोर गरीब, कामगार, वंचित, दुर्बल घटकांचे होते. परंतु प्रशासकीय व राजकीय व्यवस्था या कष्टकऱ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेऊन स्वतःचे इप्सित साध्य करीत आहे. या झोपडपट्यांमध्ये कचरा, गटार, ड्रेनेजे, औषधफवारणी, स्वछतागृह, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. तसेच अनेक वर्षांपासून झोपड्पट्टीधारक आहेत त्याच अवस्थेत आहेत. त्यांच्या मागणीनुसार पुनर्वसन किंवा शासकीय नियमानुसार त्यांना मालकी जागेचे उतारे मिळावेत अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली.

यावेळेस ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे व मारुती भापकर यांनी स्मार्ट सिटीच्याच्या बाता मारणाऱ्या प्रशासनचे वाभाडे काढले. या आंदोलनाची दखल घेऊन अपना वतन संघटनेच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. त्यानंतर अपना वतनच्या शिष्टमंडळासोबत सर्व विभागाच्या अधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

या  मोर्चामध्ये संघटनेच्या सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे, शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे, विभागप्रमुख फारुख शेख, साईनाथ ग्रुपचे शाहरुख खान, वंचित बहुजन आघडीचे सुरेश गायकवाड, शिवव्यपारी संघाचे युवराज दाखले, नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीत शहा, बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या अनिता सावळे, मानव अधिकार संघटनेच्या फातिमा अन्सारी, भीम आर्मीचे अंतिम जाधव, विकास जगधने, लहुजी ग्रुपचे स्वप्नील कसबे, सतीश कदम, दीपक खैरनार, दिलीप देहाडे, दिवेश पिंगळे, हमीद शेख, तौफिक पठाण, विशाल निर्मल, आम आदमी पार्टीचे अरविंद देवगडे, सुजय शेठ, फ्रान्सिस गजभिव, डेव्हिड काळे, दिलीप रणपिसे, यांच्यासह झोपडपट्टीतील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.