Abdul Kalam Birth Anniversary : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा

एमपीसी न्यूज : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार प्रमुख पाहुणे डॉ. कविता मेसकर (बी.डी.स) व रवी घोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अरुण चाबुकस्वार सर यांनी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती देताना ते सांगतात की राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आपला शेजारी आणि स्वतःला बलाढ्य समजून दादागिरी दाखवणाऱ्या चीनला तोडीस तोड उत्तर देण्याचे आणि वेळ पडल्यास त्याच्याशी दोन हात करण्याची धमक आपल्यात जी आता आली आहे ना त्यात कलाम साहेबांचा सिंहाचा वाट आहे. 

गजा मारणेच्या साथीदाराला इंदौर मधून अटक

डॉक्टर कलाम यांचे विचार देशातल्या मोठ्या राजकारण्यांना तर मार्गदर्शक होतेच शिवाय ते देशातल्या तरुणाईचाही एक प्रेरणास्थान होते देशातल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. रवी घोडे प्रमुख पाहुणे यांनी या महान पुरुषांबद्दल माहिती सांगितली. सूत्र संचालन शिक्षिका सरला शिंदे यांनी केला.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृन्द उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवस कार्यक्रमानिमित्त शाळेत ‘’मराठी भाषा वाचन’’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.     

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.