गजा मारणेच्या साथीदाराला इंदौर मधून अटक

एमपीसी न्यूज- गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर नुकतेच पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून पुढिल कारवाईमध्यो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने मारणे याचा साथीदार डॉ.प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याला मध्यप्रदेश येथील इंदौर येथून शुक्रवारी (दि.14) अटक केली आहे.

गजानन मारणे उर्फ गजा  मारणे याच्यावर खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी मारणे व त्याच्या टोळीवर 11 ऑक्टोबर रोजी मोक्काची कारवाई केली आहे. त्याच गुन्ह्यात डॉ. बांदिवडेकर हा देखील सामील होता. बांदिवडेकर हा मुळचा कोल्हापूरचा राहणार आहे. त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. तो इंदौरमध्ये असल्याचा पोलिसांना सुगावा लागताच पोलिसांनी इंदौरमध्ये जाऊन शुक्रवारी त्याला अटक केले.

Urja Pratishthan : ऊर्जा प्रतिष्ठानच्या अंध विद्यार्थ्यांनी बनवलेले दिवे स्त्रीशक्ती संस्थेच्या प्रदर्शनात

तपासामध्ये डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर कोल्हापूरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात खूनाचे तीन गुन्हे दाखल असून खूनाचा प्रयत्न, फसवणूक, खंडणी, धमकावणे असे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर व बेळगाव येथे एकूण 12 गुन्हे  दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा सहा यांचे पोलीस उपनिरीक्षक भेरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार व ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.