jaswant singh passes away : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे निधन

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (वय 82) यांचे आज निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दलचे ट्विट करत जसवंत सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच राजस्थानमध्ये भाजपला बळकटी देण्यात जसवंत सिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी म्हणले आहे.

जसवंत सिंग 82 वर्षांचे होते. मागील सहा वर्ष ते कोमामध्ये होते आणि त्यातच त्यांचे आज निधन झाले. राहत्या घरी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील आर्मी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जसवंत सिंह यांनी राजकारणात पाऊल टाकलं होतं. भाजपच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. 1996 ते 2004 या दरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय अशा मोठ्या जबाबदारीच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.