Hinjwadi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लँडमार्क स्टॉक या बनावट कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगला मोबादला देण्याच्या आमिषाने एकाची चार लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी राहूल राजाभाऊ भिलारे (वय 42, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलशी 7284954332, 8980739426, 9726585769 या मोबाईलवरून आरोपींनी संपर्क साधला. लॅंडमार्क स्टॉक या बनावट कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगला मोबादला देण्याचे आमिष दाखविले.

या आमिषाला बळी पडून राहूलने आरोपींना वेळोवेळी 4 लाख 21 हजार रूपये दिले. कोणताही परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुलने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.