Chakan Crime News : फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – वेळेत कर्ज काढून देण्याचे सांगून मुद्रा फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याने एका व्यक्तीची 60 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 5 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत खेड तालुक्यातील खालूंब्रे गावात घडला.

विजय कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ज्ञानेश्वर जाधव (वय 35, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय कुमार हा मुद्रा फायनान्स कंपनीत काम करतो. त्याने फिर्यादी यांना वेळेत कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवले. कर्ज काढून देण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 60 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना वेळेत कर्ज काढून न देता त्यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.