Chinchwad News : सोने देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दोन किलो सोने देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाकडून चार लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी पॉवर हाऊस चौक, चिंचवड येथे घडली.

शाम श्रीराम खर्डे (वय 63 , रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित (पूर्ण नाव माहिती नाही), एक वृद्ध महिला आणि अन्य चार अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा नोंदवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या सात्विक फूड्स या दुकानात असताना आरोपी दुकानात आले. आरोपींनी त्यांच्याकडे दोन किलो वजनाची सोन्याच्या मण्याची लगड दाखवली. ते सोने खरे असल्याचे भासवून ते देण्याच्या बदल्यात फिर्यादीकडून चार लाख रुपये घेतले. आरोपींनी दिलेल्या मण्यांना सोन्याचा मुलामा दिला असल्याचे उघडकीस आले. त्यावरून याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.