Mahalunge : रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्य़ा 52 वर्षीय पादाचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कुरुळी गावच्या हद्दीत रविवारी (दि.20) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

Akurdi : आकुर्डीत हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड, वेटरवर गुन्हा दाखल

रामकृष्ण जैमानकामी (वय 52 रा.कुरळी, मुळ नेपाळ) असे मयत नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी जैमानकामी यांचे भाचे सुनील चंद्रबहादूर काम (वय 22 रा. कुरळी) यांनी महाळुंगे (Mahalunge) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून टेम्पो चालक अनिल गंगाराम वाघ (वय 43 रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा हे पायी नाशिक-पुणे महामार्ग ओलांडत होते. यावेळी अनिल हा त्याच्या ताब्यातील टेम्पो (एमएच 14 जे.एल.9392) हे भरधाव वेगाने घेऊन येत होता. टेम्पोची धडक बसताच जैमानकामी हे गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे (Mahalunge) पोलिसांनी  गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.