मंगळवार, जानेवारी 31, 2023

Nigdi News : पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने शाळाबाह्य बालकांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

दिशा या उपक्रमांतर्गत वस्ती/ झोपडपट्टी भागातील बालक होणार स्वयंरोजगारक्षम

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, पोलीस मुख्यालय, निगडी येथे अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या संकल्पनेतून अभिनयात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मस्ती झोपडपट्टी भागातील विविध कारणांमुळे(Nigdi News) शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी विशेष बाल पोलीस पथक गुन्हे शाखा यांच्या वतीने तेरे देस होम्स जर्मनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत व्यवसाय प्रशिक्षण निवड कार्यक्रमाचे शनिवार, 3 डिसेंबर 2022  रोजी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये वस्ती झोपडपट्टी भागातील 14 ते 18 वयोगटातील सुमारे दीडशे हून अधिक शाळाबाह्य बालकांनी आपला सहभाग नोंदवून विविध व्यवसाय प्रशिक्षण मिळण्याबाबत नाव नोंदणी केलेली आहे. या बालकांचा कल तपासून त्यांच्या आवडीनुसार कोहिनूर इन्स्टिट्यूट काळभोर नगर आकुर्डी येथे एक महिना कालावधीचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये दुचाकी दुरुस्ती, इलेक्ट्रिकल वायरमन, इलेक्ट्रिकल उपकरणे दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती असे विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार क्षम करून या बालकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे

यावेळी कार्यक्रमात बोलताना अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी उपस्थित बालकांना सांगितले की “दिशा” उपक्रम तुमच्या उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून शाळाबाह्य बालकांना पुनः श्च  शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण ग्रहण केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नवीन दिशा येणार असल्याचे सांगून “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा” असे बोललो उपस्थित बालकांना मार्गदर्शन करून आलेल्या संधीचा फायदा करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

Pune News : कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुरूच राहणार-शिक्षण आयुक्त

काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त मुख्यालय म्हणाले की. अजाणतेपणामुळे काही अल्पवयीन बालके ही व्यसनाच्या आहारी जाऊन चुकीच्या संगतीमुळे नकळत गुन्हेगारी मार्गावर झुकत आहेत.(Nigdi News) अशा बालकांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याबाबत सांगून आपल्या जीवनाचा खरा आदर्श कोण व कसा असावा याबाबत उपस्थित बालकांशी डोळे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले.

तेरे देश होम्स, जर्मनी या बालकल्याण सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक मंदा शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या दिशा या उपक्रमाचे कौतुक करून तेरे देश होम्स या संस्थेमार्फत या बालकांचा कल तपासून दुचाकी दुरुस्ती, इलेक्ट्रिकल वायरमन, (Nigdi News) इलेक्ट्रिकल उपकरण दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती असे विविध महत्व व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना आश्रम रोजगार श्रम करण्यात येणार असून यासाठी कोहिनूर इन्स्टिट्यूट, आकुर्डी यांच्यासोबत एम.ओ. यू. झाला असल्याचे सांगितले. याचबरोबर कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या मुख्य व्यवस्थापिका सारिका मुळे यांनी या बालकांना येथे देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाविषयी उपस्थित सर्व बालकांना संपूर्ण माहिती करून दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा प्रदर्शन पोलिस अंमलदार कपिल इगवे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे संपत निकम (श्रेणी पोउप – निरी), महिला पोलीस नाईक दिपाली शिर्के, पोशि कपिलेश इगवे, पोशि भूषण लोहरे यांनी केले.

या कार्यक्रमास अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्यासह काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय तसेच संपत मांडवे, मुख्य व्यवस्थापक तेरे देस होम्स, जर्मनी, मंदार शिंदे, समन्वयक, तेरे देस  होम्स, जर्मनी, सारिका मुळे, मुख्य व्यवस्थापक, कोहिनूर इन्स्टिट्यूट, (Nigdi News) आकुर्डी यांच्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व वस्ती भागातील दीडशे हून अधिक शाळा बाह्य बालक व समन्वयक पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest news
Related news