Wakad News : वर्षाखेरीस दारू पाजली नाही म्हणून मित्राला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – वर्षाखेरीस म्हणजेच 31 डिसेंबरच्या दिवशी मित्राने दारू पाजली नाही म्हणून मित्राला शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना 31 डिसेंबर रोजी माऊली चौक, वाकड येथे घडली.

राजू हिरा कांबळे (वय 29, रा. वाघमारे वस्ती, दत्त मंदिर रोड, वाकड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धांत आकाश जाधव (वय 27) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी राजू कांबळे हे वाकडमधील माऊली चौकाकडून प्रिस्टन सोसायटीकडे पायी चालले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात आरोपी मित्र सिद्धांत जाधव हा भेटला. त्याने फिर्यादी कांबळे यांना ‘तू मला आता दारू पाजली नाही तर तुला दाखवतो’ असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी कांबळे यांनी आरोपीला शिव्या देऊ नको असे म्हटले. त्यावरून आरोपीने रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून फिर्यादी कांबळे यांच्या कपाळावर व गळ्यावर मारला. त्यात कांबळे जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.