Nigdi News: अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात दुचाकी चालवून अज्ञात वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भक्ती-शक्ती स्मारका समोरील उड्डाणपुलावर घडला.

महादेव लक्ष्‍मण बजबळे (वय 36, रा. लोणारवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी जितेंद्र कुमार शर्मा (वय 39, रा. चिंचवडगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास महादेव बजबळे हे त्यांच्या दुचाकीवरून अतिशय भरधाव वेगात जात होते. भक्ती-शक्ती स्मारका समोरील उड्डाणपुलावर बजबळे यांच्या दुचाकीची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. या अपघातात बजबळे यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.