Dehuroad News : किरकोळ कारणावरून पती पत्नीस मारहाण तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तुझ्या मुलाला डुकराच्या फार्मवर पाठवू नको, असे म्हणत पती पत्नीस मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) देहूरोड येथील वाल्मीकी मंदिराजवळ घडली.

किसन बालकिसन टाक (वय 41, रा. एम बी कॅम्प, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल रिडलान (वय 30), रुपेश रिडलोान (वय 25), रिकी परदेशी (वय 28, तिघे रा. एम बी कॅम्प, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास आरोपी राहुल हा फिर्यादी किसन यांना देहूरोड येथील वाल्मीकी मंदिराजवळ भेटला. त्याने फिर्यादी यांना सांगितले की, ‘तुझा मुलगा मित्रासोबत डुकराच्या फार्मवर जातो. त्याला डुकराच्या फार्म वर पाठवू नकोस’. त्यावर फिर्यादी यांनी ‘तो माझा मुलगा आहे. तो कोठेही जाईल’, असे सांगितले. त्यावरून राहुल यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या घरासमोर बसले असता आरोपी राहुल, रुपेश आणि रिकी या तिघांनी येऊन फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीस मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या दोन वाहनांचे नुकसान केले. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.